वेगवेगळ्या प्रकारची सादरीकरणे, स्लाईड्स, शैक्षणिक साधने, स्वाध्यायपत्रिका, ब्लॉग्ज, ग्रीटिंग कार्डस्, होर्डिंग्ज तयार करण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रतिमांची आणि पार्श्वभूमी म्हणून टेक्स्चर्सची गरज भासते.
अशा तऱ्हेच्या प्रतिमांसाठी/टेक्स्चर्ससाठी विविध कॅटलॉग्ज, सीडीज् विकत मिळतात. अनेक वेबसाईट्सही अशी सामग्री पुरवतात.
प्रश्न असतो तो हौशी लोकांसाठी किंवा शाळांसाठी कॉपीराईटचा भंग न करता अशा तऱ्हेची सामग्री वापरता येण्याचा. विविध प्रकारच्या कायदेशीर लायसन्सेस्च्या आधारे अशी सामग्री सशर्त / बिनशर्त वापरता यावी म्हणून सुरू झालेल्या "क्रिएटिव कॉमन्स' ह्या चळवळीची माहिती अनेकांना असेलच.
"क्रिएटिव कॉमन्स' प्रमाणेच विशेषतः शैक्षणिक साधने, दृक्-श्राव्य माध्यमासाठी पाठ तयार करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी इमेजआफ्टरसारख्या साईट्सही उपयुक्त आहेत.
Read More......